मुन्ना भाई म्हणजेच संजय दत्त हा एक कट्टर शिवभक्त आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तो अनेक वेळा शंकराची पूजा करताना दिसला आहे. आता श्रावण महिना सुरू असल्याने संजू बाबा पुन्हा एकदा शिवभक्तीत तल्लीन झालेला दिसला. त्याने त्याच्या घरी महादेवाची पूजा केली त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
संजय दत्तने नुकताच त्याचा 64 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या एका दिवसानंतर, श्रावणी सोमवारी त्यांने त्यांच्या घरी महादेवाच्या पूजेचे आयोजन केले होते. त्याने सोशल मीडियावर पूजेचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो पूर्णपणे शिवभक्तीत रमलेला पाहायला मिळतो. संजय दत्तला अशा प्रकारे पूजा करताना पाहून त्याचे चाहते खूश आहेत.
संजय दत्तने मुंबईतील घराच्या टेरेसवर ही पूजा आयोजित केली होती. पूजेदरम्यान अनेक पंडित पूजा करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. पांढरा कुर्ता पायजमा परिधान केलेला संजू बाबा पूजेत पूर्णपणे मग्न दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
फोटो शेअर करताना संजयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आज अप्रतिम शिवपूजा केली, हर हर महादेव!' या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही श्रावणात तू शंकराची खूप छान पूजा केलीस. अनेक चाहत्यांनी कमेंटमध्ये 'हर हर महादेव', 'जय महाकाल' आणि 'जय हो शिव शंकर' लिहून शंकराच्या नावाचा जप केला आहे.
संजू बाबा हा शंकराचा मोठा भक्त आहे आणि दरवर्षी तो श्रावणात शंकराची पूजा करतो. तो महाशिवरात्रीला बाबा भोलेनाथाची पूजाही विधीपूर्वक करतो. एवढेच नाही तर त्याने आपल्या डाव्या हातावर महादेवाचा टॅटू बनवला आहे, त्यावर संस्कृतमध्ये नमः शिवाय लिहिले आहे.