Close

निर्माता म्हणून मिळाली ओळख पण वडिलांचे अंतिमसंस्कार होऊ न शकल्याची सल अभिनेत्याच्या मनात कायम (Sanjay Suri Father Murder By Terrorist)

संजय सूरी याने त्यांच्या व्यावसायिक जीवनात खूप प्रसिद्धी मिळवली, परंतु त्यांचे वैयक्तिक जीवन वेदनांनी भरलेले होते. दहशतवादी हल्ल्यात वडील गमावल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मजबूरी म्हणून घर सोडल्याने त्याला रिफ्युजी कॅम्पमध्ये काही काळ काढावा लागला.   

६ एप्रिल १९७१ रोजी श्रीनगरमध्ये जन्मलेला संजय सुरी काश्मिरी पंडित आहेत. १९ वर्षे श्रीनगरमध्ये घालवली. पण एक दिवस असा आला त्यामुळे त्याचे आयुष्य कायमचे बदलले. १ ऑगस्ट १९९० हा संजय सुरीसाठी काळा दिवस ठरला. कारण त्याच दिवशी दहशतवादी हल्ल्यात त्याने त्याचे वडील कायमचे गमावले. दहशतवाद्यांनी घरात घुसून अभिनेत्याच्या वडिलांना गोळ्या झाडल्या. याच वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांचे हत्याकांड घडले होते.

वडिलांना गमावल्याचे दु:ख आजही अभिनेत्याच्या मनात कायम आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत संजय सुरी यांनी तो काळ अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता की, "तो काळ वेदनादायक होता. त्यावेळी मी १९ वर्षांचा होतो. श्रीनगरमध्ये आम्ही माझ्या वडिलांचे अंतिम संस्कारही करू शकलो नाही."

वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच संजय सुरी आपल्या कुटुंबासह श्रीनगर सोडून जम्मूला गेला. संजय आणि त्याचे कुटुंब काही काळ निर्वासित छावणीत राहिले आणि नंतर दिल्लीला स्थलांतरित झाले.

अभिनेता म्हणून संजय सुरीची कारकीर्द सुपरहिट नसली तरी निर्माता म्हणून त्याने खूप नाव कमावले. २०१० मध्ये रिलीज झालेला 'I Am' हा चित्रपट संजय सुरीने बनवला होता. याशिवाय अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Share this article