Close

श्रीनू देणार ओवीवरील प्रेमाची कबुली, लाली बसणार मोठा धक्का ( sara kahi tichyasathi update shreenu express his love for ovi in front of family )

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत नुकताच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशाला घेऊन मुंबईला जाणार आहे. त्याआधी छाया, निशी, ओवी आणि बाकीच्या मैत्रिणी निशीसोबत छोटंसं गेट टुगेदर ठरवतात. पार्टीतून निशी आणि ओवी परत येत असताना काही गुंड येऊन पैसे आणि दागिने चोरण्याचा उद्देशाने निशीवर हल्ला करतात. निशी गळ्यातलं मंगळसुत्र तिच्या गळ्यातून खेचून घेण्याचा प्रयत्न करतात तिकडे ओवी त्यांना प्रतिकार करते आणि त्या झटापटीत ओवी गंभीररीत्या जखमी होते.

निशी हादरते ती घाबरून दादा खोतांना फोन करते. ओवीची परिस्थिती गंभीर आहे घरातले सगळेच काळजीत आहेत. दादांना निशी सगळं सविस्तर सांगते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ला झाल्यांनतर ओवीवर लगेच उपचार झाले असते तर काहीतरी आशा होती पण तिला हॉस्पिटलला आणे पर्यंत खूप रक्त गेले आहे. जखम खोलवर आहे... त्यामुळे ओवी वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. हे ऐकून श्रीनू ओवीच्या रूम मध्ये जातो तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेऊन रडायला लागतो. रघुनाथ उमा, दाईची आणि लाली तिथे येतात तेव्हा श्रीनु सगळ्यांना त्याच ओवीवर असलेल्या प्रेमाची कबुली देतो. श्रीनुच्या प्रेमाला घरातल्यांची साथ मिळेल का ?

Share this article