बॉलिवूडचा किंग खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज सुपरस्टार शाहरुखचा आज ५८ वा वाढदिवस आहे.
वर्षांच्या सुरुवातीलच रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या पठाणने बॉलिवूडचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. त्यानंतर जवान रिलीज झाला तोही तसाच सुपरहिट झाला.
आता त्याचा यावर्षीचा शेवटचा सिनेमा डंकी रिलीज होतोय. शाहरुखच्या 'डंकी' चित्रपटाशी संबंधित व्हिडिओ आजच्या या खास दिवशी येणार होता आणि आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटाची झलक अखेर समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा 'डंकी' हा एक कॉमेडी ड्रामा आहे. 'डंकी फ्लाइट' नावाच्या बेकायदेशीर इमिग्रेशनच्या तंत्रावर ही कथा आधारित आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी यांनी केले आहे.
डंकीमध्ये शाहरुख खान सोबत तापसी पन्नू, दिया मिर्झा, बोमन इराणी, विकी कौशल यांच्या महत्वपूर्ण भूमिका असतील. त्यांच्याशिवाय धर्मेंद्र, सतीश शहा, परीक्षित साहनी हे कलाकार सुद्धा डंकीमध्ये दिसणार आहेत. अभिनेत्री काजोलचा यात कॅमिओ असणार आहे.हा चित्रपट २१ डिसेंबर रोजी परदेशात आणि २२ डिसेंबर २०२३ रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.