बॉलिवूड इंडस्ट्रीवर वर्षानुवर्षे राज्य करणारे अनेक अभिनेते OTT वरही आपले जादू दाखवत आहेत. इतकंच नाही तर आधी जिथे फक्त काही स्टार्स OTT वर काम करत होते, तिथे आता चित्रपटातील अनेक मोठे स्टार्स देखील OTT कडे वळत आहेत. अर्थात, अभिनेते चित्रपटांसाठी भरघोस फी घेतात, पण हे स्टार्स OTT वर वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी कोटींमध्ये फी देखील घेतात. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांनी वेब सीरिजमध्ये रस दाखवायला सुरुवात केली आहे.
मनोज बाजपेयी
चित्रपटांव्यतिरिक्त, मनोज बाजपेयी, बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक, OTT प्लॅटफॉर्मवर देखील राज्य करत आहे. मनोज बाजपेयी वेब सिरीजसाठी भरमसाट फी देखील घेतात. त्याने 'द फॅमिली मॅन'साठी 10 कोटी रुपये घेतले होते.
पंकज त्रिपाठी
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पंकज त्रिपाठी 'सेक्रेड गेम्स 2' आणि 'मिर्झापूर' सारख्या हिट वेब सीरिजमध्ये दिसले आहेत. पंकज त्रिपाठीने 'सेक्रेड गेम्स'साठी 12 कोटी रुपये फी घेतली होती, तर 'मिर्झापूर'च्या दुसऱ्या सीझनसाठी 10 कोटी रुपये फी घेतली होती.
नवाजुद्दीन सिद्दीकी
बॉलिवूडचा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी भरपूर लोकप्रिय आहे. आपल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नवाजला 'सेक्रेड गेम्स 2' साठी 10 कोटी इतकी तगडी रक्कम फी म्हणून मिळाली.
सैफ अली खान
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवल्यानंतर, त्याने 'सेक्रेड गेम्स 1' द्वारे OTT वर पदार्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार त्याने, या सीरिजमध्ये काम करण्यासाठी 15 कोटी रुपये फी घेतली होती.
अजय देवगण
बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अजय देवगणने 'रुद्र - द एज ऑफ डार्कनेस' या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या वेब सिरीजसाठी अजय देवगणने 125 कोटी रुपये फी घेतल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी त्यानुसार OTT वरील वेब सीरिजसाठी करोडो रुपये घेणाऱ्या कलाकारांमध्ये अजय देवगण अव्वल आहे.