तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या अक्षराने अधिपतीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शाळेतील शिक्षण नाही तर निदान गायनात तरी त्यांनी शिकावं अशी अक्षराची इच्छा असते. त्यासाठी भुवनेश्वर कडून परवानगी देखील काढते.
लेकाच्या इच्छे खातर भुवनेश्वर अक्षराला अधिपतीच्या गायनाची परवानगी देते. परवानगी मिळतात सुरू होतो अधिपतीच्या शिक्षकांचा शोध. अक्षरा आपल्या नवऱ्यासाठी वेगवेगळे उत्तम शिक्षक निवडते पण भुवनेश्वरीला मात्र या मान्य होत नाही. त्यामुळे ती स्वतः अधिपतींसाठी एक नवीन गाण्याची गायिका शोधते.
नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमो मध्ये भुवनेश्वरीने अधिपतीसाठी नवीन गायनाच्या शिक्षिका घरी बोलावल्या असतात. भुवनेश्वरी तिची सर्वांना ओळख करून देते. म्हणते यांच्या नावातच गाणं आहे…. सरगम. ही या गाण्याचे वेगवेगळे कार्यक्रम घेतात, टीव्हीवरील आणि रेडिओवर आहे त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम येत असतात.
सरगम ला पाहून पाहून घरातले सर्वच खुश होतात आणि अधिपती ही उत्साहाच्या भरात तिला एक नंबर आहेत मास्तरीन बाई असं म्हणतो. आपल्याला सोडून इतर बाईला अधिपतीने मास्तरीन बाई म्हटलेलं अक्षराला आवडत नाही. ती अधिपती वर नाराज होते.