Close

दीपिका कक्कडच्या प्रेमात दिवाना झाला होता शोएब इब्राहिम, अभिनेत्रीला मिळवण्यासाठी स्टारडमही लावलं पणाला (When Shoaib Ibrahim Fell Madly in Love with Dipika Kakar, Had Put Stardom at Stake to Marry Actress)

'ससुराल सिमर का' फेम दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या प्रेमकहाणी त्यांच्या चाहत्यांना माहित आहे. याच शोच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले होते. सीरियलमध्ये प्रेम भारद्वाजची भूमिका साकारून लोकप्रियता मिळविलेल्या शोएब इब्राहिमची लव्ह लाईफ फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. त्याची ऑनस्क्रीन पत्नी सिमरच्याच तो प्रेमात पडला. शोएबला दीपिकाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की अभिनेत्रीला मिळवण्यासाठी त्याने आपले स्टारडम पणाला लावले होते.

मध्य प्रदेशातील भोपाळचा राहणारा शोएब इब्राहिम दीपिकाच्या प्रेमात पडला तेव्हा दीपिकाचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. हे माहीत असूनही त्याने दीपिकावर मनापासून प्रेम केले आणि तिला आपल्या आयुष्यात आणण्यासाठी खूप मेहनत घेतली. इतकेच नाही तर दीपिकाला पत्नी बनवण्यासाठी त्याने आपले स्टारडम पणाला लावले.

दीपिका आणि शोएबची पहिली भेट 'ससुराल सिमर का'च्या सेटवर झाली होती. या मालिकेत काम करत असताना दोघे कधी एकमेकांच्या जवळ आले, हे त्यांनाच कळले नाही. यानंतर शोएब इब्राहिमने मालिका सोडली तेव्हा दीपिकाला त्याच्या अनुपस्थितीत प्रेमाची जाणीव झाली. दीपिकाच नाही तर शोएबच्या मनाचीही तिच अवस्था होती. अशा स्थितीत दोघांनी एकमेकांना आपल्या मनाची अवस्था सांगितली.

एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्यानंतर शोएब आणि दीपिका जवळपास तीन वर्षे डेट करत होते. डेटिंग दरम्यान, शोएबच्या घरच्यांना जेव्हा दीपिकासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला, पण शोएबने त्याची पर्वा केली नाही, त्याने आपल्या कुटुंबीयांना या नात्यासाठी नुसतं पटवलं नाही, तर त्याचं स्टारडमही पणाला लावलं.

'ससुराल सिमर का' नंतर शोएब आणि दीपिकाने 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोच्या मंचावर शोएबने जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त केले आणि दीपिकाला प्रपोज केले आणि तिला अंगठी घातली. नॅशनल टीव्हीवर शोएबला प्रपोज करताना पाहून दीपिका खूप भावूक झाली आणि तिने लग्नाला होकार दिला.

दोघांनीही आपलं प्रेम लग्नाच्या मुक्कामापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर 2018 साली दोघांनी थाटामाटात लग्न केलं. शोएबशी लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्म स्वीकारला आणि नाव बदलून फैजा इब्राहिम असे ठेवले. आता लवकरच दीपिका आणि शोएब त्यांच्या पहिल्या अपत्याचं स्वागत करणार आहे. ते खूप उत्सुक आहेत.

Share this article