Close

सना आणि अनसने उघड केले बाळाचे नाव, सोबतच सांगितला नावाचा अर्थ (Sana Khan And Husband Anas Saiyad Reveals their Baby Boy Name, Know The Meaning)

अभिनेत्री सना खानने ५ जुलै रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. जन्म दिल्यानंतर, आता सना खान आणि तिचा पती अनस सय्यद यांनी त्यांच्या मुलाचे नाव तसेच मुलाच्या अनोख्या नावाचा अर्थ उघड केला आहे.

२०२० मध्ये अभिनेत्री सना खानने बॉलिवूडला रामराम केले आणि सुरतचा मोठा उद्योगपती मौलाना अनस सय्यद यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षानंतर सनाने ५ जुलै रोजी एका मुलाला जन्म दिला.

पहिल्यांदाच आई-वडील झालेले सना आणि अनस सध्या खूप आनंदी आहेत. आता या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव उघड केले आहे. नाव सांगण्यासोबतच सना आणि अनस यांनी मुलाच्या अनोख्या नावाचा अर्थही सांगितला आहे.

सना आणि अनस सय्यद यांनी त्यांच्या मुलाचे नाव सय्यद तारिक जमील ठेवले आहे. 'ईटाईम्स'शी बोलताना अभिनेत्रीने मुलाच्या नावाचा अर्थ सांगितला आणि म्हणाली, 'आपल्या नावाचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडतो. म्हणून, आम्हा दोघांनाही आमच्या बाळाचे नाव शुद्ध, सौम्य, काळजी घेणारे आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक असे ठेवायचे होते. आम्हाला जमील हे नाव आवडते. जमील म्हणजे सुंदर आणि तारिक म्हणजे आनंददायी.

आई झाल्यानंतर तिच्या भावनांबद्दल विचारले असता, अभिनेत्री म्हणाली - ही जगातील सर्वोत्तम भावनांपैकी एक आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की ते माझे मूल आहे आणि मी आई बनले आहे. ही आयुष्यभराची जबाबदारी आहे आणि मुलाच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही जबाबदार आहोत. मातृत्वाच्या काळात स्त्रीमध्ये अनेक बदल होतात, जेव्हा तुमचे बाळ रडते तेव्हा तुम्हाला ते जाणवते. नवजात बाळाला कसे धरायचे, त्याला कसे खायला द्यावे हे नवीन आईला माहित नाही, या क्षणी, माझी सासू त्याचे डायपर बदलत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/