साहित्य : अर्धा कप बारीक शेवया, 1 ग्लास फ्रिजमधील थंडगार दूध, 4 टीस्पून पिठी साखर वा साधी साखर, 2 टीस्पून सब्जाचे बी, अर्धा कप कापलेले पिस्ता आणि बदाम, 6 टीस्पून रोझ सिरप वा रुह अफजा, 2 स्कूप आइस्क्रीम वा कुल्फी, चेरीज.
कृती : प्रथम शेवया उकळत्या पाण्यात शिजवाव्यात. नंतर त्यातील पाणी काढून थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवाव्यात. पिस्ता आणि बदाम बाजूला काढून त्याचे काप करावेत. उरलेले पिस्ता, बदाम, दूध, साखर मिक्सरमध्ये वाटून घ्या. थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. सब्जाचे बी पाण्यात भिजवत ठेवा.
फालुदा सर्व्ह करण्यासाठी : एक उभा ग्लास घ्यावा. प्रथम शिजवलेल्या शेवया टाकाव्यात. यावर सब्जाचे बी, थंड दूध आणि रोझ सिरप टाका. सर्वात शेवटी आइस्क्रीम घालून त्यावर रोझ सिरपचे काही थेंब टाका. बदाम-पिस्त्याचे काप आणि चेरी लावून सजवा.