Close

एगलेस मँगो मूस (Eggless Mango Mousse)

सध्या आंब्याचा मोसम सुरू आहे. तुम्ही पण आंब्याच्या नवनवीन रेसिपीज शोधत असाल तर आजची आपली ही टेस्टी अन्‌ झटपट बनणारी रेसिपी जरूर करून बघा. एगलेस मँगो मूस बनवायला जेवढी सोपी, तेवढीच खाण्यास स्वादिष्ट रेसिपी आहे.

मँगो क्रीम बनविण्यासाठी :

२ कप पिकलेला आंबा क्यूब्स मधे कापून घ्या.

दीड कप व्हीप्ड क्रीम

१/४ कप पिठीसाखर

सजावटीसाठी : १/२ कप आंबा (चौकोनी तुकडे केलेले)

१/४ कप आंबा प्युरी

२ चमचे त्रुटी-फ्रुटी, ३-४ चेरी

कृती :

ब्लेंडरमध्ये व्हीप्ड क्रीम, मँगो प्युरी आणि साखर मिसळा आणि मऊ होईपर्यंत एकजीव करा.

प्रथम एका लहान ग्लासमध्ये आंब्याचे चौकोनी तुकडे घाला.

नंतर मँगो क्रीम आणि मँगो पल्प घाला. ३

ते ३० मिनिटे सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

फ्रीजमधून काढा आणि टुटी-फ्रुटी आणि चेरीने सजवा आणि सर्व्ह करा.

Share this article