अनेकदा नायिकांचा मेकअप, स्टाइल, ब्युटी ट्रीटमेंट्स चर्चेत असतात. नायिका आपले वय आणि सौंदर्य लपवण्यासाठी खूप पैसा खर्च करतात. काही वेळा त्यांना यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. पण या बाबतीत हिरो देखील काही कमी नाहीत. आपला लूक छान व्हावा यासाठी ते नाना प्रयत्नही करतात. ब्युटी ट्रीटमेंट घेण्याच्या बाबतीत ते अभिनेत्रींना स्पर्धा देतात. चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांनी आपले वय कमी दिसण्यासाठी त्वचा आणि केसांच्या उपचारांचा अवलंब केला आहे. कोण आहेत ते कलाकार, जाणून घेऊया...
शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा लूक खूपच चांगला आहे. त्याचे सिक्स पॅक अॅब्स चर्चेत आहेत. शाहरुख त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीची खूप काळजी घेतो आणि सिक्स-पॅक अॅब्स मिळवण्यासाठी त्याने जबरदस्त कसरत केली यात शंका नाही. पण, त्याचवेळी शाहरुखही त्याच्या लूकची खूप काळजी घेतो. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली आहे. तरूण दिसण्यासाठी त्याने इतरही अनेक इंजेक्शन्स घेतल्याचे बोलले जात आहे.
अक्षय कुमार
अभिनेता आमिर खान इंडस्ट्रीत त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आमिर सकाळी लवकर उठतो आणि व्यायाम करतो. याशिवाय तो त्याच्या लुकचीही खूप काळजी घेतो. रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार पूर्णपणे फिट आहे, पण त्याचे केस गळायला लागले आहेत. यासाठी त्यांनी विग घालून चित्रपटांमध्ये काम केले, पण नंतर त्याने हेअर ट्रान्सप्लांट केले. असे ऐकिवात आहे. पण यात कितपत सत्य आहे, हे त्यालाच ठाऊक.
आमिर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या चित्रपटांमधील परफेक्शनसाठी ओळखला जातो. अभिनयासोबतच तो त्याच्या लूककडेही खूप लक्ष देतो. रिपोर्ट्सनुसार, आमिरने चेहऱ्यावरील सुरकुत्या काढण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीही केली होती.
रणबीर कपूर
रणबीर कपूरची गणना बॉलिवूडमधील देखण्या स्टार्समध्ये केली जाते. चाहत्यांना त्याच्या लूकचे वेड लागले आहे. रणबीर त्याच्या लुक आणि स्टाइलची विशेष काळजी घेतो. रिपोर्ट्सनुसार, त्याने लग्नाआधी केसांची रेषा निश्चित केली होती. यासाठी त्याचे हेअर ट्रान्सप्लांट करण्यात आले. पण याबाबतीत रणबीरकडून काहीही वाच्यता झालेली नाही.
सलमान खान
सलमान खानला मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हटले जाते. लूकच्या बाबतीत तो त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांना मागे टाकतो. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने व्यक्तिमत्त्व सुंदर करण्यासाठी अनेक ब्युटी ट्रीटमेंटचा अवलंब केला आहे. त्याचे हेअर ट्रान्सप्लांट झाले होते, त्याशिवाय बोटॉक्स ट्रीटमेंट आणि चीक फिलरही केले होते. बोटॉक्स हे एक औषध आहे हे लक्षात ठेवा. ते त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्ती तरुण दिसते. बोटॉक्स उपचारादरम्यान चेहऱ्याच्या सुरकुत्या असलेल्या भागात इंजेक्शनचे डोस दिले जातात. यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना आराम मिळतो आणि त्वचा चमकदार होते. या उपचारामुळे सुरकुत्या कमी होतात. या संपूर्ण प्रक्रियेला बोटॉक्स उपचार म्हणतात.
सैफ अली खान
सलमानप्रमाणेच छोटे नवाब सैफनेही बोटॉक्स ट्रिटमेंट करून घेतली आहे.
शाहीद कपूर
शाहीद कपूरनेही प्लास्टिक सर्जरी केल्याचे म्हटले जाते, परंतु याबद्दल अभिनेत्याने काहीच दुजोरा दिलेला नाही.
असो. या सर्व कलाकारांकडे एम व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्याने ते कायमस्वरुपी सुंदर दिसण्यासाठी कधीही काहीही करु शकतात.