चीज कुल्चा
साहित्य : 1 किलो मैदा, अर्धा टीस्पून बेकींग पावडर, 200 मि.ली. दूध, 50 ग्रॅम दही, 25 ग्रॅम यीस्ट, चिमूटभर साखर, 1 टेबलस्पून कोथिंबीर, लिंबाचा रस, एक वाटी किसलेले चीज, 1 टीस्पून चाट मसाला, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.
कृती : मैदा चाळून यात बेकींग पावडर, दूध, दही, मीठ आणि पाणी मिसळा. गरम पाण्यात यीस्ट मिसळा. यात चिमूटभर साखर मिसळून थोडा वेळ तसेच ठेवा. यात लिंबाचा रस मिसळून हे पाणी मैद्यात मिसळा. पीठ मळून घ्या आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा. आता कुस्करलेल्या चीजमध्ये चाट मसाला, कापलेली कोथिंबीर व मीठ मिसळा. हे मिश्रण पिठाच्या गोळ्यांमध्ये भरा आणि मोठी पोळी लाटा. ग्रिलला तेल लावून वा मायक्रोव्हेवमध्ये कुलचा भाजून घ्या.
चीज कुल्चा (Cheese Kulcha)
Link Copied