कोबी-पुदिना पराठा
साहित्य : सारणासाठी : 1 कप किसलेला कोबी, अर्धा कप बारीक चिरलेला पुदिना, स्वादानुसार मीठ व पराठा मसाला.
कणकेसाठी : 3 कप गव्हाचे पीठ, स्वादानुसार मीठ.
इतर : तेल किंवा बटर.
कृती : नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. सारणाचे सर्व साहित्य चांगले एकजीव करून मिश्रण तयार करा. कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून, त्यात सारण भरा आणि पराठे लाटून घ्या. तव्यावर बटर किंवा तेल सोडून त्यावर हे पराठे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.
Link Copied