Close

होळी स्पेशल: कटाची आमटी (Holi Special: Katachi Amati)

कटाची आमटी
साहित्य : 6 वाटी चण्याच्या डाळीचा कट (डाळ शिजवल्यावर त्यातील जास्तीचं पाणी), 1 वाटी चण्याची शिजवलेली डाळ,
1 टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ, 4-5 टीस्पून किसलेला गूळ, 4 टीस्पून सुकं खोबरं, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून काळा मसाला, 2 टीस्पून लाल तिखट, स्वादानुसार मीठ.
फोडणीसाठी : 2 टीस्पून तेल, प्रत्येकी 1 टीस्पून मोहरी, हिंग व हळद, 3-4 लवंगा, 2 मोठे तुकडे दालचिनी, 4-5 तमालपत्रं,
5-6 कडिपत्त्याची पानं.
कृती : शिजवलेली चण्याची डाळ घोटून त्यात कटाचं पाणी घाला आणि एकजीव करून घ्या. नंतर त्यात चिंचेचा कोळ, तिखट आणि स्वादानुसार मीठ घालून मध्यम आचेवर ठेवा. दुसर्‍या आचेवर कढई ठेवून त्यात सुकं खोबरं आणि जिरं खमंग भाजून घ्या. नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्या. डाळीला उकळी फुटू लागली की, त्यात खोबरं-जिर्‍याची पूड घाला. नंतर गूळ आणि काळा मसाला घालून व्यवस्थित एकत्र करा.
फोडणीच्या पळीत तेल चांगलं गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी द्या. नंतर त्यात लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि कडिपत्त्याची पानं घाला. ही फोडणी डाळीवर घालून मिश्रण एकजीव करून एक चांगली उकळी येऊ द्या.
टीप :
चण्याची डाळ मुद्दाम शिजवून, चांगली घोटून त्यात पाणी घालूनही कट तयार करता येतो.
काळा मसाला नसल्यास गोडा मसालाही वापरता येईल.

Share this article