मैसूर मसाला बोंडा
साहित्य : 1 कप मैदा, पाव कप तांदळाचं पीठ, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा कप दही, गरजेनुसार पाणी, 1 टीस्पून आलं बारीक केलेलं, 1 कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून कोथिंबीर (ह्या तीन गोष्टी बारीक चिरून घ्या.), तळण्यासाठी तेल.
कृती : एका बाऊलमध्ये मैदा, तांदळाचं पीठ, दही, बेकिंग सोडा, मीठ, हिरवी मिरची, आलं, कांदा आणि जिरं एकत्र करून त्याचं घट्टसर मिश्रण बनवून घ्या. गरजेनुसार पाणी त्यात घालून मिश्रण चांगलं फेटा. नंतर बाऊलवर झाकण घालून 20 मिनिटं तसंच ठेवा. नंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मध्यम आकाराचे बोन्डे (वडे) बनवून घाला. ते सोनेरी रंगाचे होईस्तोवर तळून घ्या. तयार बोन्डे खोबर्याच्या चटणीसोबत खा.