पनीर खुशनुमा
साहित्य : 250 ग्रॅम पनीर (मोठे चौकोनी तुकडे केलेले), 1 टेबलस्पून सुंठ पूड,
1 टीस्पून रोजमेरी पूड (बाजारात उपलब्ध), 2 टेबलस्पून काजू पेस्ट, अर्धा कप फेटलेलं ताजं व घट्ट दही, थोडं किसलेलं चीज,
प्रत्येकी 1 टीस्पून लाल मिरची पूड आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, काही किवी फळाचे स्लाइस, स्वादानुसार मीठ.
कृती : एका बाऊलमध्ये दही, काजू पेस्ट, चीज, सुंठ पूड, रोजमेरी पूड, मीठ लाल मिरची पूड, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ एकत्र करून घेऊन एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणात पनीरचे तुकडे अर्ध्या तासाकरिता मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. नंतर हे पनीरचे तुकडे ग्रील करण्याच्या सळीमध्ये रोवून तंदूरमध्ये ग्रील करा. गरमागरम पनीर खुशनुमा किवीच्या स्लाइसेसने सजवून हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
व्हेज गोल्ड कॉइन
साहित्य : 2 ब्रेडचे स्लाइस (गोलाकार कापून घ्या), अर्धा कप उकडलेल्या मिश्र भाज्या (फ्लॉवर, कोबी, फरसबी इत्यादी), 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 उकडलेला बटाटा, 2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), थोडे पांढरे तीळ, स्वादानुसार मीठ व पांढरी मिरी पूड, तळण्याकरिता तेल.
कृती : सर्व भाज्या, बटाटा, हिरव्या मिरच्या, मीठ, मिरी पूड आणि कॉर्नफ्लोअर यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण ब्रेडच्या स्लाइसवर ठेवून त्यावर दुसरी स्लाइस ठेवा आणि ब्रेडच्या कडा दाबून बंद करा. त्यावर तीळ भुरभुरून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.