पनीर-स्प्रिंग ऑनियन पराठा
साहित्य : सारणासाठी : एक जुडी कांद्याची पात (बारीक चिरून थोडीशी वाफवलेली), 250 ग्रॅम पनीर, 1 टीस्पून बारीक चिरलेले आले, 1 कांदा (बारीक चिरलेला),
पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ.
कणकेसाठी : 2 कप गव्हाचे पीठ, थोडे साजूक तूप, कोमट पाणी, स्वादानुसार मीठ.
इतर : तूप.
कृती : पनीर स्मॅश करून घ्या. त्यात कांद्याची पात व सारणासाठीचे इतर सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून, त्यात पनीरचे मिश्रण भरा आणि पराठे लाटून घ्या. हे पराठे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तूप लावून खमंग भाजून घ्या.
Link Copied