Close

पेसारट्टू डोसा आणि आल्याची चटणी (Pesarattu Dosa And Ginger Chutney)

पेसारट्टू डोसा


साहित्य : 2 कप मूग डाळ, पाव कप तांदूळ, 1 लहान आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : मूग डाळ व तांदूळ 7-8 तास भिजत ठेवा. नंतर मूग डाळ व तांदळामध्ये मीठ व तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात थोडेसे मीठ घालून मिश्रण एकजीव करा आणि तासाभरासाठी झाकून ठेवा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यास तेल लावून, त्यावर डोशाचे मिश्रण पसरवा. डोशाच्या कडेने तेल वा तूप सोडा. डोसा कुरकुरीत झाल्यावर आचेवरून उतरवा. चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

आल्याची चटणी

साहित्य : 1 आल्याचा तुकडा (चिरलेला), 1 गुळाचा तुकडा, 1 कांदा (चिरलेला), 2 अख्ख्या लाल मिरच्या (भिजवलेल्या), स्वादानुसार मीठ.
फोडणीकरिता : प्रत्येकी अर्धा टीस्पून मोहरी व जिरे, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले व कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्या. थंड झाल्यावर त्यात लाल मिरच्या, गूळ व मीठ एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
दुसर्‍या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी-जिर्‍याची फोडणी करा. आले-कांद्याच्या वाटणामध्ये ही फोडणी एकत्र करून सर्व्ह करा.

Share this article