Close

पुरण खवा बर्फी आणि पुरणाचे लाडू (Puran Khava And Puran Ladoo)

पुरण खवा बर्फी आणि पुरणाचे लाडू


साहित्य : 1 वाटी शिजवलेलं पुरण, 1 वाटी खवा, दीड वाटी साखर, अर्धा टीस्पून वेलदोड्यांची पूड, पाव वाटी काजू-बदामाचे पातळ काप, काही केशर काड्या.
कृती : डाळीचं पुरण, खवा आणि साखर एकत्र करून शिजत ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. साखर वितळल्यामुळे हे मिश्रण प्रथम पातळ होईल. मात्र सतत ढवळत घट्ट येईपर्यंत शिजवा. नंतर त्यात वेलदोड्यांची पूड, केशर काड्या आणि काजू-बदामाचे काप घालून एकत्र करा. मिश्रण तळ सोडू लागल्यावर, एका ताटाला तुपाचा हात लावून, त्यात हे मिश्रण ओता आणि पसरवा. साधारण थंड झाल्यावर, सुरीने काप पाडा.

पुरणाचे लाडू


साहित्य : 4 वाटी चणा डाळ, 3 वाटी साखर, 8-10 वेलदोड्यांची पूड, बेदाणा, बदाम.
कृती : डाळ स्वच्छ धुऊन चार तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. नंतर चाळणीत उपसून पाणी काढून टाका आणि बारीक वाटून घ्या. वाटलेली डाळ तुपावर गुलाबी रंगावर चांगली परतून घ्या. पातेल्यात साखर घेऊन त्यात ती साधारण भिजेपर्यंत पाणी घाला आणि साखरेचा गोळीबंद पाक तयार करा. त्यात भाजलेली डाळ एकत्र करा. नंतर त्यात वेलदोड्यांची पूड, बेदाणा व बदामाचे काप घालून एकत्र करून ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावेत.

Share this article