सोयाबीन पराठा
साहित्य : अर्धा कप सोयाबीन (पाण्यात भिजवून पेस्ट केलेले), 1 टीस्पून तूप, 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा कप किसलेले गाजर व दुधी, 2 टीस्पून बारीक चिरलेला पुदिना,
2 टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून बारीक केलेला अनारदाना, तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त सर्व साहित्य एकत्र करून त्याचे कणीक मळून घ्या. कणकेचे पराठे लाटून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तेल लावून खमंग भाजून घ्या.
Link Copied