Close

रताळ्याचा हलवा (Sweet Potato Halwa)

रताळ्याचा हलवा

साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेलं रताळं, अर्धा कप साखर, स्वादानुसार वेलची पूड, 2 टेबलस्पून तूप, 2 टेबलस्पून काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून मनुका.

कृती :
रताळे मळून, अगदी लगदा तयार करा. कढईत तूप गरम करून यात रताळे परतवा. त्यात वेलची पूड आणि साखर घालून मंद आचेवर 20 मिनिटं शिजवा. नंतर त्यात काजू आणि मनुका घालून एकत्र करा. मिश्रणाला तूप सुटू लागल्यावर आच बंद करा. गरमागरम हलवा सर्व्ह करा.

Share this article