Close

या कलाकारांना निर्मात्यांनी न सांगताच काढले होते चित्रपटाबाहेर (When Makers Removed These Stars From film Without Informing)

बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटींच्या चाहत्यांमध्ये आपापल्या आवडत्या कलाकाराबद्दल प्रचंड लोकप्रियता दिसून येते, त्यामुळे चाहते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. कलाकारांना जसे चित्रपटात कास्ट केल्यावर त्यांची चर्चा होते त्याचप्रमाणे त्यांना चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवल्यावरसुद्धा चर्चा होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवडू कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांना न सांगताच चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते.

सारा अली खान

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खानने बॉलिवूड इंडस्ट्रीत फार कमी कालावधीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. मात्र, तिला न सांगता एका रात्रीत 'द अमर अश्वत्थामा' चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्याने अभिनेत्रीला धक्का बसला होता. स्क्रिप्टमध्ये बदल केल्याचे कारण पुढे करुन तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.  

कार्तिक आर्यन

एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या कार्तिक आर्यनला करण जोहरच्या 'दोस्ताना 2' चित्रपटातून कोणतीही माहिती न देता बाहेर फेकण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन आणि करण जोहरमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता, ज्यामुळे त्याला चित्रपटातून बाहेर फेकण्यात आले होते.

आलिया भट्ट

'राबता' या चित्रपटात क्रिती सेनॉनच्या जागी आलिया भट्ट दिसणार होती, पण निर्मात्यांनी तिला चित्रपटातून काढून टाकले आणि तिच्या जागी क्रितीला घेण्यात आले. आलियाला चित्रपटातून काढून टाकण्याचे कारण अभिनेत्रीच्या तारखा जुळत नसल्याचे सांगण्यात येते.  

अर्जुन कपूर

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर 'कबीर सिंह' चित्रपटात दिसणार होता, पण नंतर निर्मात्यांनी त्याला चित्रपटातून काढून टाकले, त्यानंतर अर्जुन कपूरच्या जागी शाहिद कपूरला साईन करण्यात आले. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

तापसी पन्नू

निर्मात्यांकडून चित्रपटातून बाहेर काढल्या जाणार्‍या स्टार्सच्या यादीत तापसी पन्नूचे नाव देखील समाविष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तापसी पन्नूला पहिल्यांदा 'पति पत्नी और वो' चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले होते, परंतु नंतर तिला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले. तापसीला चित्रपटातून काढून टाकल्यानंतर तिच्या जागी भूमी पेडणेकरला घेण्यात आले.

गोविंदा

गोविंदा गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण एक काळ असा होता की बॉलिवूडमध्ये त्याचं नाणं खणखणीत चालायचं. अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत, परंतु जेव्हा त्याला 'जग्गा जासूस' चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तेव्हा अभिनेताला धक्का बसला आणि त्याच्या जागी रणबीर कपूर घेण्यात आले होते.

प्रियांका चोप्रा

देसी गर्ल प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला एकापाठोपाठ एक दोन चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आले होते. निर्मात्यांनी तिला न कळवता चित्रपटातून हाकलून दिल्याचे सांगितले जाते.

सनी देओल

बॉलिवूड अभिनेता सनी देओल लवकरच 'गदर 2' या चित्रपटात दिसणार आहे, मात्र त्यालाही निर्मात्यांनी एका चित्रपटातून काढले होते. रिपोर्ट्सनुसार, सनी देओल 'पृथ्वीराज' चित्रपटात दिसणार होता, परंतु नंतर निर्मात्यांनी त्याला चित्रपटातून काढून टाकले आणि त्याच्या जागी अक्षय कुमारला घेतले.

दीपिका पादुकोण

इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक दीपिका पादुकोण देखील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना न सांगता चित्रपटातून वगळण्यात आले.  अभिनेत्रीला 'बैजू बावरा' चित्रपटासाठी साइन करण्यात आले होते, परंतु नंतर तिला चित्रपटातून वगळण्यात आले.

Share this article