Close

शुगर फ्री बर्फी (Sugar Free Barfi)

शुगर फ्री बर्फी


साहित्य : 200 ग्रॅम खजूर, काजू-बदाम व पिस्त्याचे तुकडे, वेलची पूड, केशर व चांदीचा वर्ख.

कृती : खजूर बारीक चिरून घ्या व मंद आचेवर शिजवा. त्यात काजू-बदाम-पिस्त्याचे तुकडे, केशर व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रणाचा गोळा तयार झाल्यावर आच बंद करा. तुपाचा हात लावलेल्या ट्रे वा ताटात हे मिश्रण घालून सारखे करा. मिश्रण थोडे थंड झाल्यावर, त्यावर चांदीचा वर्ख लावून, सुरीने चौकोनी आकाराच्या चिरा द्या. पूर्णतः थंड झाल्यावर थाळी वा ट्रेमधून बाहेर काढा.

Share this article