टँगी टोमॅटो विथ कलिंगड
साहित्यः 6 टोमॅटो, 3 कप कलिंगडाच्या फोडी, अर्धा कप पिठी साखर, 2 टिस्पून रोझ सिरप, प्रत्येकी पाव टिस्पून मीठ व काळी मिरी पूड.
कृतीः सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. ग्लासमध्ये बर्फ घालून थंडगार सर्व्ह करा.
मँगो लस्सी
साहित्य: पाऊण कप दूध, 1 कप दही, पाऊण कप आंब्याचा रस, टेबलस्पून साखर, पाव टिस्पून वेलची पूड, सजावटीसाठी बदाम पिस्त्याचा भरडसर चुरा.
कृती: दूध, दही, मँगो पल्प, साखर आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये व्यवस्थित ब्लेंड करून घ्यावी. 2 सर्व्हींग ग्लासेसमध्ये लस्सी ओतावी. वरून पिस्ता-बदामची पूड घालून सजवावे. फ्रिजमध्ये गार करावी आणि मग सर्व्ह करावी.