Close

दिमाखात पार पडला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’, रेड कार्पेटवर कलाकारांचा दिसला अनोखा अंदाज (Star Pravah Parivar Award Red Carpet Look)

कलाकार आणि प्रेक्षक वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात तो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ नुकताच दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं यंदाचं पाचवं वर्ष. त्यामुळे प्रवाह परिवाराच्या उपस्थितीत केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

स्टार प्रवाह परिवार सोहळ्याच्या रेड कार्पेट थीमची नेहमीच चर्चा असते. प्रत्येक मालिकेच्या टीमला दिला जाणारा रंग आणि थीम यामुळे रेड कार्पेटवर कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा असतो. यंदाही कलाकारांच्या एकापेक्षा एक पेहरावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना आपण त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला.

१६ मार्चला सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५ पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते. यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे.

खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा पाहायला विसरू नका रविवारी १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Share this article