बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन हिच्या वैवाहिक जीवनात गेल्या काही काळापासून काही चांगले चालले नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यातील दरी आणि घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. तथापि, या जोडप्याने या बातम्यांवर कधीही प्रतिक्रिया दिली नाही आणि मौन बाळगले. 2024 च्या अखेरीस, मुलगी आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक एका लग्नाच्या कार्यक्रमात एकत्र दिसले. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहतेही खूप खूश झाले, तर आता पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अभिषेकला एकत्र पाहून चाहते खूश झाले आहेत.
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन संपवून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन आपली मुलगी आराध्यासोबत मुंबईत परतले आहेत. दोघेही ४ जानेवारीला सकाळी मुंबई विमानतळावर आराध्यासोबत दिसले होते, ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
४ जानेवारीला सकाळी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांची मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना दिसले. या जोडप्याला एकत्र पाहून हे दोघेही आपल्या मुलीसोबत कुठेतरी नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करून मुंबईला परतले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एअरपोर्टवर अभिषेक बच्चन ग्रे रंगाच्या हुडी आणि ब्लॅक ट्राउजरमध्ये दिसला, तर ऐश्वर्या आणि आराध्याची स्टायलिश स्टाईलही पाहायला मिळाली. यादरम्यान ऐश्वर्या रायने काळ्या रंगाचा फुल स्लीव्हज टॉप घातला होता आणि त्यासोबत तिने काळ्या रंगाचे जेगिंग्ज पेअर केले होते.
यावेळीय आराध्या पांढऱ्या रंगाच्या ट्राउझर्समध्ये निळ्या रंगाच्या फुल स्लीव्हज स्वेट शर्टमध्ये दिसली. ऐश्वर्या नेहमीप्रमाणे ओपन हेअरस्टाईलमध्ये दिसली तर आराध्याने हेअरबँडने केसांची स्टाइल केली होती. विमानतळावरून बाहेर पडताना, मायलेकींनी पापाराझींना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
दुसरीकडे, अभिषेक बच्चनही हसत हसत विमानतळाबाहेर आला आणि पापाराझींचे हात जोडून स्वागत केले. इतकंच नाही तर त्याची पत्नी आणि मुलीबद्दल अभिनेत्याची काळजीही पाहायला मिळाली. त्याने ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याला आपल्या कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि नंतरतो स्वतः त्याच गाडीतून घरी निघून गेले. ऐश्वर्या आणि अभिषेकला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.