सोशल मीडियावर चाहत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इंडस्ट्रीतील तीन सुपरस्टार - शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार आणि अभिनेत्री कम मॉडेल सौंदर्या शर्मा पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. याआधीही हे तीन स्टार्स पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी दिसले होते. त्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले गेले.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि अजय देवगण उघड्या छताच्या कारमध्ये बसून घराबाहेर अक्षय कुमारची वाट पाहत आहेत. त्यांनी अक्षय कुमारला खाली येण्यासाठी हाक मारली पण अक्षय कानात हेडफोन लावून गाणं ऐकत होता त्यामुळे तो खाली जात नाही. त्याचवेळी शाहरुखने टेनिस बॉल घराच्या दिशेने फेकला आणि बॉलने शेजारच्या सौंदर्या शर्माच्या घराची काच फोडली, त्यानंतर सौंदर्या शर्मा बाल्कनीत येते.
भीतीपोटी, शाहरुख अजयला दोष देतो, अजय पान मसाल्याचे पॅकेट उघडतो आणि खाऊ लागतो, अक्षयच्या घराकडे बोट दाखवतो आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. त्या सुगंधाने प्रभावित होऊन अक्षय घरातून बाहेर पडतो आणि खाली येतो. तिन्ही मित्र भेटतात असे या व्हिडिओत दाखवले गेले आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.