आलू मसाला
साहित्य: 2 बटाटे, 2 गाजर (बारीक चिरून). 200 ग्रॅम फ्लॉवर चिरून, 1 कांदा (बारीक चिरलेला), 1/4 कप नारळ (किसलेले), 1 टीस्पून ओरेगॅनो, 2 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर, 2 चमचे नारळाचे दूध.
कृती: बटाटे धुवून उकडवा पण साल काढू नका. नंतर बटाटे कापून त्याचे चार भाग करा. गाजर आणि फ्लॉवर वाफेवर शिजवा. त्यात बारीक चिरलेला कांदा मीठ, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, किसलेले खोबरे आणि लसूण पाकळ्या घाला. एका प्लेटमध्ये चिरलेले बटाटे ठेवा, त्यावर भाज्यांचे मिश्रण घाला, वर नारळाचे दूध घाला.
Link Copied