Close

नवरात्र स्पेशल: आलू पराठा (Aloo Paratha)

नवरात्र स्पेशल: आलू पराठा

साहित्य : 4-5 उकडलेले बटाटे, 1 वाटी वरई, अर्धा वाटी केळ्याचे पीठ, 3 चमचे मिरची-आले-जिरे यांचे वाटण, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ.

कृती : बटाटे सोलून, जाडसर किसून घ्या. त्यात मीठ, कोथिंबीर व वाटण घालून चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे लहान लहान गोळे वळा. वरई-केळ्याचे पीठ व मीठ एकत्र चाळून घ्या. त्यात गरजेनुसार गरम पाणी घालून पीठ मळून घ्या. हे पीठ थोड्या वेळाकरिता तसेच ठेवून द्या. नंतर या पिठाची वाटी तयार करून त्यामध्ये सारण भरा व गोळी बंद करा. आता ही गोळी अलगद लाटा. गरम तव्यावर कोरडा किंवा तेल-तुपावर पराठा शेकून घ्या.

Share this article