Close

आलू राजवाडी (Aloo Rajwadi)

साहित्य: 500 ग्रॅम लहान बटाटे, 300 ग्रॅम टोमॅटो, 10 लसूण पाकळ्या, 20 ग्रॅम आले, 20 ग्रॅम कोथिंबीर, 20 ग्रॅम हिरवी मिरची, लाल तिखट, 1 टेबलस्पून धणे पावडर, 200 ग्रॅम कांदा, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून गरम मसाला, 5 ग्रॅम जिरे, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : बटाटे मीठाच्या पाण्यात उकडून सोलून तळून घ्या, आता भांड्यात तेल गरम करा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण आणि कांदा घाला. कांदा हलका तपकिरी रंगाचा झाल्यावर त्यात बारीक चिरलेले आले आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. आता टोमॅटो प्युरी घाला. धणेपूड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले परतून घ्या. तळलेले बटाटे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवा. कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करा.

Share this article