Close

आलू राजवाडी व कोथिंबीर पुदिना बटाटा (Aloo Rajwadi And Coriander Mint Potato)

आलू राजवाडी
साहित्यः 500 ग्रॅम छोटे बटाटे (बेबी पोटॅटो), 300 ग्रॅम टोमॅटो, 10 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 20 ग्रॅम बारीक चिरलेलं आलं, 20 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून एव्हरेस्ट धणे पूड, 200 ग्रॅम कांदे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 5 ग्रॅम जिरे, 1 टेबलस्पून तेल व मीठ चवीनुसार.
कृतीः बटाटे मऊ होईपर्यंत उकडून घ्या. हे बटाटे सोलून तळून घ्या. दुसर्‍या पॅनमध्ये तेल गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. नंतर लसूण व कांदा घालून परता. कांदा गुलाबीसर झाल्यानंतर आलं व मिरची घालून परता. आता टोमॅटोची प्युरी बनवून यात घाला. एव्हरेस्ट धणे पूड, लाल मिरची पूड, गरम मसाला व मीठ घालून परता. तळलेले बटाटे व गरजेनुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्या. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.


कोथिंबीर पुदिना बटाटा
साहित्यः 3 उकडलेले बटाटे, 2 टीस्पून तेल, चिमूटभर हिंग, 4-5 कढीपत्ता, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव टीस्पून हळद, चिरलेली कोथिंबीर, 2 टीस्पून चिरलेला पुदिना, 1 टीस्पून लिंबाचा रस, मीठ चवीनुसार.
कृतीः कढईत तेल गरम करून हिंगाची फोडणी द्या. कढीपत्ता व हिरवी मिरची टाका. कापलेले बटाटे टाका. हळद व मीठ टाकून मंद आचेवर शिजवा. कोथिंबीर, पुदिना व लिंबाचा रस घालून शिजवा.

Share this article