Close

अनुपन खैर यांनी हटके अंदाजात केली नव्या चित्रपटाची घोषणा, सिंहासनावरील लूक होतोय व्हायरल (Anupam Kher shares first look from new film, Asks fans to guess the film)

अनुपम खेर यांच्या अभिनयावरच नव्हे, तर त्यांचा स्वभाव, शब्द आणि दृष्टीकोनावरही लोक फिदा आहेत. चित्रपटांसोबतच अनुपम खेर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत असतात. देशात आणि समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते आपला दृष्टिकोन ठेवतात त्यांचा दृष्टीकोन त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावतो. याच कारणामुळे सोशल मीडियावर त्यांचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत.

एक अभिनेता म्हणूनही त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत आणि हा ट्रेंड पुढेही सुरू आहे. अनुपम यांनी नुकतेच रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील चित्रपटाची घोषणा केली आहे, तर आता त्यांनी त्यांच्या पुढील नवीन चित्रपटाची घोषणाही केली आहे, हा त्यांचा ५३९ वा चित्रपट असेल. अनुपमने चित्रपटातील त्याच्या फर्स्ट लूकचे पोस्टर रिलीज केले आहे ज्यामध्ये ते पात्राच्या गेटअपमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये अनुपम सिंहासनावर बसलेले असून त्यांच्या आजूबाजूला फक्त साप दिसत आहेत. अनुपम यांनी या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी हा एक काल्पनिक चित्रपट असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून लोक उत्साहित झाले आहेत.

अनुपम खेर यांनी त्यांच्या 539 व्या चित्रपटातील त्यांच्या गेटअपचा पहिला फोटो त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे आणि त्यांच्या चाहत्यांना चित्रपटाच्या थीमचा अंदाज घेण्यास सांगितले आहे. चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर करताना अनुपमने लिहिले, 'घोषणा: माझा ५३९ वा चित्रपट. पौराणिक कथा किंवा कोणत्याही महान महाकाव्यांवर आधारित नाही तर भारतातील सर्वात मोठा बहुभाषिक कल्पनारम्य चित्रपट आणि तुम्हा सर्वांना हा विषय चांगलाच माहीत आहे. 24 ऑगस्ट रोजी निर्माते चित्रपटाचे तपशील शेअर करतील. दरम्यान तुम्ही तुमचे अंदाज माझ्यासोबत शेअर करू शकता. विजयी व्हा.'

आता अनुपम खेरच्या या पोस्टवर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. नवीन चित्रपटातील हा लूक शेअर करताच तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि चाहते कमेंट करून चित्रपटाच्या विषयाचा अंदाज घेत आहेत. एका युजरने कमेंट केली, 'ही चंद्रकांता आहे आणि तुम्ही शिवदत्तची भूमिका करत आहेस.' तर दुसऱ्याने लिहिले- मिस्टर इंडिया. मोगॅम्बो खूश हुओ. काहींनी याला नागीन किंवा नगिनाचा सिक्वेल म्हटले आहे, तर काहींनी शक्तीमानचा अंदाज लावला आहे. एका युजरने तर ते एकता कपूरच्या टीव्ही शो नागीनशी जोडले आणि लिहिले, 'नागिन 7, कलर्स टीव्हीवर.

Share this article