बनाना मूस
साहित्य : 75 ग्रॅम डार्क चॉकलेट, 100 ग्रॅम क्रिम, पाव टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 2 कप कुस्करलेली केळी.
कृती : चॉकलेटचे तुकडे करा. डबल बॉयलर पद्धतीने वा मायक्रोव्हेवमध्ये ते वितळवून घ्या. दुसर्या बाऊलमध्ये क्रिम फेटून घ्या. फेटताना त्यात व्हॅनिला इसेन्स टाका. आइस्क्रीम बाऊलमध्ये कुस्करलेली केळी टाकून त्यावर चॉकलेट ओता. यावर फेटलेले क्रिम टाका. थंड होण्याकरिता फ्रिजमध्ये ठेवा. चॉकलेटच्या तुकड्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.
Link Copied