साहित्य : 1 किलो कोबी, 3 टेबलस्पून लाल मिरची पूड, 3 टेबलस्पून पिवळी मोहरी, 3 टेबलस्पून तेल,
2 टेबलस्पून कलौंजी, 1 टीस्पून बडीशेप, स्वादानुसार मीठ.
कृती : बडीशेप जाडसर वाटून घ्या. कोबी स्वच्छ धुऊन कोरडा करा आणि बारीक चिरून घ्या. मीठ आणि सर्व मसाले एकत्र करा. एका पॅनमध्ये तेल कोमट गरम करून, ते मसाल्याच्या मिश्रणामध्ये एकत्र करा. त्यात कोबी घालून एकजीव करा. हे मिश्रण दहा मिनिटं झाकून ठेवा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं चार-पाच दिवस व्यवस्थित मुरू द्या. नंतर खाण्यास घ्या.
Link Copied