चटपटीत चाट
साहित्य : 1 कप सुरणाचे काप, 1 कप रताळ्याचे काप, 1 कप बटाट्याचे काप, 1 कोथिंबिरीची जुडी, 1 पुदिन्याची जुडी, 2-3 हिरव्या मिरच्या, 200 ग्रॅम ताजं व घट्ट दही, तळण्यासाठी तेल, स्वादानुसार सैंधव, सजावटीसाठी थोडे डाळिंबाचे दाणे आणि थोडे भाजलेले काजू.
कृती : सुरण, रताळे आणि बटाटे यांचे पातळ आणि लांबट काप करा. कढईमध्ये तेल गरम करून त्यात हे काप सोनेरी रंगावर तळून टिश्यू पेपरवर निथळत ठेवा. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मीठ आणि दही एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्या. सुरण-रताळे-बटाट्याचे काप साधारण थंड झाल्यावर त्यात स्वादानुसार हिरवी चटणी घाला आणि व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यावर डाळिंबाचे दाणे आणि काजू घालून सजवा आणि सर्व्ह करा.