Close

आलिया दीपिकाचीं इन्स्टावर योगा पोजवरुन चर्चा, चाहत्यांनीही लुटली मजा (Deepika Padukone Asks Fans To The Name Of A Yoga Pose which she post , Alia Bhatt, Gulshan Devaiah And Others Comment)

२१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दीपिका पदुकोणने तिचा योगा करतानाचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना त्या योगासनाचे नाव विचारले. अभिनेत्रीच्या या पोस्टनंतर आलिया भट्ट आणि गुलशन देवैया व्यतिरिक्त इतर लोकांनी दीपिकाच्या या पोस्टवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त संपूर्ण जग योगा करून आपले फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणनेही योगा करतानाचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये विचारले होते - विचार करा आणि सांगा ही कोणती मुद्रा आहे. #worldyogaday.

योगा पोजचा हा फोटो शेअर होताच व्हायरल होऊ लागला. अभिनेत्रीच्या या फोटोवर केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर सोशल मीडिया यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. प्रथम आलिया भट्टने कमेंट बॉक्समध्ये पपी पोज लिहून उत्तर दिले

अभिनेते गुलशन देवय्या आणि फ्रेडी दारूवाला यांनीही कमेंट केली.

योग शिक्षिका इंदू अरोरा यांनी लिहिले - हे जनुवक्ष आसन आहे हे आसन मणक्याच्या विश्रांतीसाठी खूप फायदेशीर आहे. हे कुत्र्याच्या पिल्लाची पोज नाही.

Share this article