ग्रेप अॅण्ड लेमन ग्रास कुलर
साहित्यः 1 किलो हिरवी द्राक्षे, पाऊण कप चहाची पात, पाव कप पुदिन्याची पाने, 1 टिस्पून काळे मीठ, 1 टिस्पून जिरे पूड, 3-4 टिस्पून पिठी साखर, बर्फाचा चुरा गरजेनुसार.
कृतीः वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घालून त्यावर हे मिश्रण गाळून ओता. तयार आहे, ग्रेप अॅण्ड लेमन ग्रास कुलर.
कोकम कोला
साहित्यः 1 कप कोकम, 1 कप पाणी, अर्धा कप साखर, 1 लिटर कोणत्याही प्रकारचे सोडायुक्त पेय. (कोला), 1 टिस्पून काळे मीठ, 1 टिस्पून जिरे पूड.
कृतीः कोकम, पाणी, साखर एकत्र करून प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्या होईपर्यन्त शिजवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात काळे मीठ व जिरेपूड घाला. सर्व्ह कराताना ग्लासमध्ये कोकमाचे मिश्रण घेऊन बर्फ घाला आणि त्यावर कोला हळूहळू ओता. पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.