Close

हरियाली चीज पराठा (Hariyali Cheese Paratha)

हरियाली चीज पराठा

साहित्य : 2 कप मैदा, अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप पालक प्युरी (पालकाची पाने स्वच्छ करून, मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यात घालून शिजवा आणि नंतर पाण्याशिवाय मिक्सरमधून बारीक करून घ्या), 1 कप किसलेले चीज, 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 बटाटा (उकडून साले काढून स्मॅश केलेला), अर्धा कप मटार (शिजवून भरडलेले), थोडे तेल व स्वादानुसार मीठ.

कृती :  तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एकत्र करून कणीक मळून घ्या. या कणकेचे त्रिकोणी आकाराचे पराठे तयार करून, दोन्ही बाजूंनी तेल लावून खमंग भाजून घ्या. हरियाली चीज पराठा दह्यासोबत सर्व्ह करा.

Share this article