हेल्दी ऑम्लेट
साहित्य : 4 अंड्यांमधील पांढरा भाग, 1 कप बारीक चिरलेले मशरूम, अर्धा कप मोड आलेले जाडसर भरडलेले मूग, अर्धा कप जाडसर भरडलेले मटार, पाव कप किसलेला गाजर, एका कांद्याची पात बारीक चिरलेली, अर्धा टीस्पून किसलेलं आलं, पाव टीस्पून मिरपूड, आवश्यकतेनुसार तेल, स्वादानुसार मीठ.
कृती : एका भांड्यात अंड्यातील पांढरा भाग फेस येईपर्यंत चांगला फेटून घ्या. त्यात मशरूम, मोड आलेले मूग, मटार, गाजर, कांद्याची पात, आलं आणि मिरपूड घालून पुन्हा चांगलं फेटा. मीठ घालून पुन्हा फेटा. आता एका पॅनमध्ये चमचाभर तेल गरम करून त्यावर ऑम्लेटचं थोडं मिश्रण घाला. मंद आचेवर दोन्ही बाजूने हलकं तपकिरी रंगाचं होईपर्यंत शिजवून घ्या.
टीप : यात कांदा, टोमॅटो, पालक यांसारख्या तुमच्या आवडीच्या भाज्यांचाही वापर करता येईल.