Close

कैरी व कांद्याचं लोणचं (Kairi And Onion Lonche)

साहित्य : 1 मध्यम आकाराची कैरी तासून किसलेली (साधारण अर्धा कप), 1 कप बारीक चिरलेला कांदा (शक्य असल्यास पांढरा कांदा घ्या), स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून मोहरी, पाव टीस्पून मेथीदाणे, अर्धा टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून किंवा स्वादानुसार लाल मिरची पूड, 2 टीस्पून ते 2 टेबलस्पून किसलेला गूळ (तुमच्या आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणानुसार हे प्रमाण ठरवावं), 2 टेबलस्पून तेल.
कृती : कैरीचा कीस, कांदा, लाल मिरची पूड, मीठ आणि गूळ एका वाडग्यात घेऊन हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्या. फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात मेथीदाणे, हिंग आणि हळद घाला. नंतर ही फोडणी थंड होऊ द्या. थंड केलेली फोडणी कैरी-कांद्याच्या मिश्रणात घालून व्यवस्थित एकत्र करा. हे लोणचं पराठा, दहीभात यासोबत छान लागतं. फ्रीजमध्ये ठेवल्यास 3 ते 4 दिवस छान टिकतं.

Share this article