Close

काश्मिरी वडा आणि बादशाही कबाब (Kashmiri Vada And Badshahi Kabab)

काश्मिरी वडा


साहित्य : 1 कप उकडून कुस्करलेले मटार, अर्धा कप मावा, 2 बटाटे उकडून कुस्करलेले, पाव कप पुदिन्याची पानं बारीक चिरलेली, 1 अननसाची चकती बारीक चिरलेली, 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरलेली, 2-3 टेबलस्पून बदामाचे काप, 2 टेबलस्पून पिस्त्याचे काप, 1 टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, पाव कप भाजलेलं बेसन, 1 टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, एका लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : एका वाडग्यात तेलाव्यतिरिक्त सर्व साहित्य घेऊन व्यवस्थित एकजीव करून घ्या.
या मिश्रणाच्या चपट्या वड्या तयार करा. कढईत तेल गरम करून वडे सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम काश्मिरी वडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

बादशाही कबाब


साहित्य : 3 बटाटे उकडून कुस्करलेले, 50 ग्रॅम पनीर किसलेलं, अर्धा कप ब्रेड क्रम्स, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप काजूचे तुकडे, 2 टेबलस्पून मनुका, 2 टेबलस्पून टुटी-फ्रुटी, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून मोहरी, 2 टेबलस्पून कसुरी मेथी, 1 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, 1 कप मिश्र भाज्या (गाजर, फरसबी, मका, मटार इत्यादी), एका लिंबाचा रस, पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेला कांदा, आवश्यकतेनुसार रवा किंवा ब्रेडक्रम्स, तळण्यासाठी तेल आणि स्वादानुसार मीठ.
कृती : भाज्या बारीक चिरून कुकरमधून शिजवून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. आता तेल आणि रवा किंवा ब्रेडक्रम्स सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्या. या मिश्रणाच्या हृदयाच्या आकाराच्या वड्या तयार करा. हे कटलेट रवा किंवा ब्रेडक्रम्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. गरमागरम बादशाही कटलेट्स हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article