बॉलिवूड दिवा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. पण यात कितपत तथ्य आहे हे मला माहीत नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोराने अर्जुन कपूरच्या कुटुंबीयांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे लव्हबर्डमधील ब्रेकअपच्या अफवेला अधिकच हवा मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सातत्याने मोटिव्हेशनल कोट्स पोस्ट करत आहे, ज्यामुळे ती नेटिझन्सच्या नजरेत आली आहे. मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्यात काहीतरी बिनसले आहे, असे मलायकाच्या चाहत्यांना वाटते.
ब्रेकअपच्या या अफवांदरम्यान मलायका अरोराने तिच्या बॉयफ्रेंडच्या कुटुंबातील सदस्यांना अनफॉलो केल्याची बातमी येत आहे. ज्यामुळे ते दोघे विभक्त होण्याच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली आहे. मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक प्रेरक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की मजबूत व्हा. यावरून युजर्सचा अंदाज आहे की मलायकाने अर्जुनच्या बहिणी जान्हवी कपूर, अंशुला कपूर आणि खुशी कपूरला अनफॉलो केले आहे