साहित्य : कढईत आटवून घट्ट केलेले दूध (रबडी एवढे)े दीड लिटर, वेलची पूड 1 टीस्पून, 3 पिकलेल्या आंब्यांच्या फोडी, 5 ते 6 टी स्पून पिस्ते (5 मिनिटे उकडून साल सोललेले), अर्धी वाटी ओले खोबरे (वरचे काळे साल काढून बारीक केलेले तुकडे), साखर दीड वाटी, फेटलेले फ्रेश क्रीम 1 वाटी, 3 टीस्पून कॉर्नफ्लोअर.
कृती : दूध आटवून मंद आचेवर ठेवा व त्यात एक वाटी साखर टाका. एकदम थंड फ्रेश क्रीममध्ये अर्धी वाटी साखर घालून फेटून घ्या. फेटलेले क्रिम फ्रीजमध्ये ठेवा. 3-4 चमचे दुधामध्ये कस्टर्ड पावडर घोळवून आटवलेल्या गरम दुधात ओता. सारखे हलवत रहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. हे दूध गॅस बंद करून थंड करायला ठेवा व मधून मधून हलवत रहा. मग यात आंब्याचे तुकडे, खोबरे, उकडून सोलून घेतलले पिस्ते घाला. फेटून घेतलेले फ्रेश क्रिम घाला. सगळे मिश्रण एकत्र करून घ्या व फ्रीजरमध्ये ठेवा. अर्धवट सेट व्हायला लागले की, पुन्हा हलवून घ्या. म्हणजे बर्फाचे क्रिस्टल्स होणार नाहीत. असे दोन वेळा करा. मग एका मोल्डमध्ये कुल्फी सेट करा. सेट झाल्यावर याचे स्लाइस कापून सर्व्ह करा.
टिप : कापलेल्या खोबर्याऐवजी किसलेले खोबरे वापरता येईल. तसेच सीताफळ वापरून देखील अशाच पद्धतीने छान कुल्फी तयार होते.
मँगो कोेकोेनट पिस्ता कुुल्फी (Mango Coconut Pista Kulfi)
Link Copied