साहित्य : 300 ग्रॅम उडदाची डाळ, 10 ग्रॅम मेथी दाणे, 3-4 बारीक कापलेली हिरवी मिरची, चिमूटभर सोडा व हिंग, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ.
कृती : उडदाची डाळ 4-5 तास भिजत ठेवा. पाणी निथळून मेथी दाणे टाकून वाटून घ्या. वाटलेल्या डाळीत मीठ, हिंग आणि सोडा टाका. गोलाकार आकार करून मध्ये छिद्र पाडा. मेदू वडे तळून घ्या. सांबार आणि चटणीसह सर्व्ह करा.
Link Copied