Close

Top Stories

Our top stories from todays news

Must reads
Show More Posts

Lifestyle

Health & Fitness

Entertainment Marathi

टीव्ही मालिकांमुळे केवळ मनोरंजन होतं असं नाही तर चाहत्यांची स्वप्न देखिल पूर्ण होऊ शकतात. कोल्हापूरच्या वंदना लोहार या स्टार प्रवाहच्या चाहतीने नुकताच याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. स्टार प्रवाहच्या ‘उदे गं अंबे’ मालिकेसाठी एक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकाला साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातून भरभरुन प्रतिसाद देण्यात आला. जवळपास दीड लाख प्रेक्षक या स्पर्धेत सहभागी झाले. कोल्हापूरच्या रोहिणी यांनी देखिल या स्पर्धेत भाग घेतला आणि अचूक उत्तर देऊन साडेतीन तोळ्याची सुवर्णमुद्रा जिंकण्याचा मान पटकावला. उदे गं अंबे मालिकेतील भगवान शिवशंकर म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे आणि आदिशक्ती म्हणजेच मयुरी कापडणे यांच्या हस्ते रोहिणी यांना ही सुवर्णमुद्रा सुपूर्द करण्यात आली. स्टार प्रवाहकडून मिळालेली ही अनमोल भेट मी कायम जपून ठेवेन. उदे गं अंबे मालिकेतील भगवान शिवशंकर आणि आदिशक्ती यांनी कोल्हापुरात आमच्या घरी येऊन ही खास भेटवस्तू दिली याचा आनंद गगनात मावत नाहीय. मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपिठांची गोष्ट आम्हा प्रेक्षकांना अनुभवयला मिळत आहे.

Read more...