मिरची वडा
साहित्य: 250 ग्रॅम जयपुरी मिरची, 75 ग्रॅम बेसन, 75 ग्रॅम उकडलेले बटाटे, 8 ग्रॅम मोहरी, 5 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 5 ग्रॅम कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 5 ग्रॅम लाल मिरची पावडर, 3 ग्रॅम गरम मसाला, 3 ग्रॅम आले, 2 लसूण पाकळ्या, 2 ग्रॅम हळद, लिंबाचा रस, 50 ग्रॅम तेल.
कृती : जयपुरी मिरची पुसून त्यांच्या मध्यभागी चीर पाडा. उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. हिरवी मिरची, आले आणि लसूण यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट मॅश केलेल्या बटाट्यात घाला. या मिश्रणात मीठ, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद घाला. कढईत 25 ग्रॅम तेल गरम करून त्यात मोहरी घाला, मोहरी तडतडायला लागली की जिरे घाला. जिरे गडद तपकिरी रंगाचे झाल्यावर बटाट्याचे मिश्रण घाला आणि मिश्रण भांड्याला चिकटू लागेपर्यंत शिजवा. कोथिंबीर आणि लिंबू घालून भांडे गॅसवरून उतरवा. मिश्रण थंड झाल्यावर मिरचीमध्ये भरा. तळण्यासाठी तेल गरम करून बेसनमध्ये चवीनुसार मीठ घालून पातळ पीठ बनवा. मिरच्या पिठात घोऴवून गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. तळलेल्या मिरचीचे तुकडे करा आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.
मिरची वडा (Mirchi Vada)
Link Copied