Close

मिरचीचे लोणचे व पेरूचे लोणचे (Mirchiche Lonche And Peruche Lonche)

मिरचीचे लोणचे
साहित्यः पाव किलो ताज्या हिरव्या मिरच्या, 10 लिंबे, 1 चमचा मेथीदाणे, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, पाव वाटी फोडणीसाठी तेल, 1 चमचा मोहरी व अर्धा चमचा हिंग.
कृतीः मिरच्या धुऊन, पुसून त्यांची डेखे काढावीत व त्यांचे लहान लहान तुकडे करावेत. तेल तापवावे. त्यात मेथी तळून घ्यावी व उरलेल्या तेलात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. लिंबाचा रस काढून तो मीठ-मिरच्यांवर घालावा. मेथीची पूड व हळदही घालावी. फोडणी गार झाली की ती पण घालावी. हे सर्व मिश्रण कालवावे व बरणीत भरून त्यास घट्ट झाकण लावून ठेवावे.

पेरूचे लोणचे
साहित्यः 2 पेरू, अर्धी वाटी गूळ किंवा साखर, 1 चमचा मोहरीची डाळ, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा तिखट, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ.
कृतीः पेरू जरासे शिजवून घ्यावेत. गरम असतानाच त्यांत गूळ घालावा. तिखट, मीठ, जिरेपूड, मोहरीची डाळ, लिंबाचा रस घालून ढवळावे. नंतर वरतून फोडणी द्यावी. हे लोणचे तीन-चार दिवस टिकते.

Share this article