मिक्स कॉकटेल
साहित्य : एक कप अननसाचा रस, एक संत्र्याचा रस, एक कप पेरूचा रस, थोडीशी पुदिन्याची पाने, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार शुगर सिरप, बर्फाचे तुकडे.
कृती : अननस, पेरू आणि संत्र्याचा रस एकत्र करा. यात चाट मसाला, लिंबाचा रस आणि शुगर सिरप मिसळून मिश्रण ब्लेण्ड करा. पुदिन्याची पाने टाकून सजवा आणि थंडगार कॉकटेल ज्यूस सर्व्ह करा.
वॉटरमेलन मिंट
साहित्य : 2 कप कलिंगडाचा ज्यूस, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 2 टीस्पून रोज सरबत, एक वाटी कलिंगडाच्या फोडी, 1 टेबलस्पून बारीक कापलेली पुदिन्याची पाने.
कृती : कलिंगडाच्या रसात लिंबाचा रस, काळी मिरी पावडर आणि रोज सरबत मिसळा. यात कलिंगडाच्या फोडी टाका. पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि सर्व्ह करा.