Close

नवरात्र स्पेशल: नूडल्स सूप (Noodles Soup)

नवरात्र स्पेशल: नूडल्स सूप


साहित्य : 1 वाटी उकडलेल्या बटाट्यांचा कीस, अर्धा वाटी किसलेले पनीर, प्रत्येकी 1 चमचा आले-मिरची-जिरे वाटण, दीड वाटी तेलात तळून टिश्यू पेपरवर निखळलेला बटाट्यांचा लांबट कीस, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ.

कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर आले-मिरची-जिर्‍याचे वाटण परतवा. लगेचच त्यावर पनीर व बटाट्याचा कीस घाला. नंतर त्यात 4 वाटी गरम पाणी ओता व रवीने घुसळून घ्या. मिश्रणाला एक उकळी आली की, त्यात मीठ व कोथिंबीर घाला. नूडल्स सूप सर्व्ह करताना, बाऊलमध्ये गरमागरम सूप घालून त्यावर बटाट्याचा तळलेला कीस घाला. सर्व्ह करताना सूपमध्ये लिंबाचा रस घातल्यास छान चव येते.

Share this article