ओनियन रिंग्ज
साहित्य : 500 ग्रॅम मैदा, 25 ग्रॅम बेकींग पावडर, 100 ग्रॅम कॉर्नफ्लोर, 100 ग्रॅम दूध, 80 ग्रॅम क्रिम, 4 कांदे गोल आकारात कापलेले, 15 ग्रॅम चाट मसाला, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : एका वाडग्यात मैदा, कॉर्नफ्लोर, मीठ आणि बेकींग पावडर मिसळा. यात हळूहळू दूध, क्रिम आणि पाणी टाकून एकजीव करून घ्या. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. ज्यामुळे ते हलके होईल आणि फुगेल. कढईत तेल गरम करा. आता कांद्याच्या चकत्या या मिश्रणात बुडवून तेलात तळून घ्या. यावर चाट मसाला भुरभुरवून टोमॅटो केचअपसह सर्व्ह करा.
Link Copied